निवृत्त बँक कर्मचाऱ्यांचे द्वैवार्षिक अधिवेशन

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Bank of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशनच्या नागपूर युनिटचे द्वैवार्षिक अधिवेशन ११ ऑगस्ट रोजी माधवनगर येथील गोळवलकर सभागृहात पार पडले. बँकेचे संचालक प्रसेनजीत फडणवीस, उपमहाप्रबंधक जी. अनंतकुमार, संघटनेचे अध्यक्ष मोहन घोळवे व पदाधिकारी उपस्थित होते.
 
 

vara3 
 
 
ॲड. अविनाश तेलंग यांनी कर्मचारी हिताच्या विषयावर प्रभावी मनोगत व्यक्त केले. विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल किशोर उदार व सुरेश घुगरे यांचा सत्कार करण्यात आला..यावेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या २५ निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष कार्याबद्दल किशोर उदार व सुरेश घुगरे यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोहन टोंगे यांनी, तर आभार प्रदर्शन सुभाष गोडबोले यांनी केले.
सौजन्य:सुधीर वाराणशीवर,संपर्क मित्र