अमेरिकेत भारतीय कुटुंबात दुहेरी हत्याकांड; मुलावरच आरोप

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
मॅसॅच्युसेट्स,
Double murder of an Indian family in the US अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यात भारतीय वंशाच्या कुटुंबातील दुहेरी हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ॲक्टन येथे १७ वर्षीय अर्जुन अरविंद याच्यावर त्याची ४५ वर्षीय आई सुधा व्यंकटेशन आणि १४ वर्षीय भाऊ सिद्धार्थ अरविंद यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. घरात प्राणघातक हल्ला केल्यानंतर अर्जुन आईची कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याचे तपासात समोर आले आहे.मिडलसेक्स जिल्हा ॲटर्नी मारियन रायन आणि ॲक्टनचे पोलीस प्रमुख डग्लस स्टर्निओलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲक्टनमधील मार्था लेन येथील घरात मंगळवारी दोन्ही मृतदेह आढळून आले. सिद्धार्थचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर, तर सुधा यांचा मृतदेह तळघरात सापडला. दोघेही गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यासाठी नेमके कोणते शस्त्र वापरण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
 
 
try667887
 
११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी अर्जुनच्या वडिलांनी ॲक्टन पोलिसांना फोन करून कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक मार्था लेन येथील घरात पोहोचले असता दोघेही मृतावस्थेत आढळले. दरम्यान, अर्जुन घरात नसल्याचे आणि तो आईच्या कारमधून निघून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.घटनेनंतर तपास यंत्रणांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच स्थानिक नागरिकांकडूनही माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान अर्जुनचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले. बुधवारी पहाटे मॅसॅच्युसेट्समधील वेलँड येथील एका पार्किंग लॉटमधून त्याला अटक करण्यात आली.
 
 
अर्जुन अरविंद याच्यावर दोन हत्यांचे गुन्हे, कुटुंबातील किंवा घरातील सदस्यावर हल्ला व मारहाणीचे दोन आरोप, परवानगीशिवाय वाहन वापरणे आणि मोटार वाहन चोरीचे आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून, या दुहेरी हत्येमागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जात आहे. बोस्टनपासून सुमारे ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ॲक्टनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे.