डॉ. पिंपरकर परीवाराचा हेल्थकेअर लीडर पुरस्काराने गौरव

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
वाशीम,
dr pimparkar family आठ दशकाचा वारसा आणि तीन पिढ्यांची समृद्ध परंपरा असलेल्या मालेगाव येथील पिंपरकर परिवाराला देशातील अग्रगण्य अशा टाइम्स ऑफ इंडिया परिवाराने हेल्थकेअर लीडर या पुरस्काराने गौरान्वित केले. डॉ. जयंत पिंपरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. एकता पिंपरकर यांनी अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते हेल्थकेअर लीडर हा टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचा अवार्ड स्वीकारला.
 
 
dr pimparkar family
 
पिंपरकर परिवाराने आयुर्वेदाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपलेसे केले. आयुर्वेद रत्न असलेले डॉ. गंगाधर पिंपरकर, हे या परिवाराचे कुलगुरू. १९४० पासून म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी आयुर्वेद सेवेला मालेगाव मधून सुरुवात केली होती. हाच वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. चंद्रशेखर पिंपरकर यांनी १९६५ पासून पुढे चालवला. वंध्यत्व, पक्षाघात, ज्वर यांच्यावर हमखासपणे उपचारासाठी त्यांची फक्त पंचक्रोशीतच नव्हे तर राज्याच्या राजधानी पर्यंत प्रसिद्धी होती. डोंबिवली पासून रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत.
 
 
हाच वारसा तिसर्‍या पिढीतील डॉ.जयंत चंद्रशेखर पिंपरकर यांनी २००० पासून पुढे नेला, पण यावेळेस त्यांनी आपले आजोबा आणि वडीलांचे कार्यक्षेत्रात रुग्णसेवा न करता मंगरूळनाथ हे शहर रुग्णसेवेसाठी निवडले.वारसा तोच, चिकित्सा पद्धती तीच पण त्याला त्यांनी अत्याधुनिकतेची जोड दिली. पत्नी डॉ. एकता यांची साथ त्यांना मिळाली आणि पिंपरकर हॉस्पीटल आज फक्त मंगरूळनाथ तालुयातच नव्हे तर जिल्ह्यात आपले वेगळे अस्तित्व ठेवून कार्यरत आहे.