डॉमिनोजला दणका...पाच आउटलेट्सचे परवाने निलंबित

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
मुंबई
domino pizza outlets अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला असून, दररोज FDAकडून विविध हॉटेल्स, उपहारगृहे आणि रेस्टॉरंट्सवर धाडी टाकल्या जात आहेत. या कारवाईमुळे अनेक मोठ्या फूड जॉइंट्सच्या मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर FDAने डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट्सवरही धाड टाकून कारवाई केली आहे.
 

fda suspends licenses of 5 domino pizza outlets in mumbai and maharashtra 
FDAच्या तपासणीदरम्यान डॉमिनोज पिझ्झाच्या काही आउटलेट्समध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थांसाठी एकच प्लॅटफॉर्म वापरला जात असल्याचे तपासणीत समोर आले. या पार्श्वभूमीवर डॉमिनोज पिझ्झाच्या पाच आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.यामध्ये मुंबईतील विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सचा समावेश आहे. याशिवाय मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सचेही परवाने निलंबित करण्यात आले आहेत.ज्यूबिलंट फूडवर्क्स अंतर्गत ही डॉमिनोज पिझ्झाची आउटलेट्स सुरू होती. राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईचा हा एक भाग असून, अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांचे पालन न करणाऱ्या मोठ्या फूड जॉइंट्सवरही FDAकडून कारवाई केली जात असल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये धाक निर्माण झाला आहे.