घाटंजी तहसील सुनावणीत ज्वारी खरेदीचा पर्दाफाश

-एकाच शेतकऱ्यांकडून 250 क्विंटल बोगस ज्वारी खरेदी -दोन दिवसात यादी देण्याचे तहसीलदारांचे आदेश

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
sorghum-procurement-scam : घाटंजी तालुक्यात ज्वारी खरेदीमध्ये सुरू असलेल्या ‘डिजिटल घोटाळ्याबाबत’ 12 ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीत भारतीय किसान संघाने सादर केलेल्या पुराव्यांमुळे खरेदी विक्री संघाच्या व्यवस्थापकाने घाटंजी केंद्रावर जास्तीत जास्त 250 क्विंटल ज्वारी केवळ 2 ते 4 शेतकèयांकडून खरेदी केल्याची धक्कादायक कबुली दिली. तर या शेतकèयांची संपूर्ण यादी व सातबारा शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
 

y13Aug-Jwari 
 
या सुनावणीस भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष विजय धानोरकर, विदर्भ प्रांत युवा प्रमुख राम जिल्लडवार, जिल्हा कोषाध्यक्ष जनार्धन एलटीवार, मधुसूदन जगताप, घाटंजी तालुका सदस्य गोवर्धन एलटीवार, सुनील पेठलवार, अरविंद एलटीवार, अशोक बंडेवार व तालुक्यातील अनेक ग्राम समित्यांचे अध्यक्ष व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
सुनावणीत राम जिल्लडवार यांनी अधिकृत लेखी जवाब तहसीलदारांसमोर दाखल केला. यात व्यापाèयांनी शेतकèयांच्या नावावर बोगस ऑनलाईन ‘ई-पीक पाहणी’ नोंदी मंजूर करून घेतल्या आहेत. परराज्यातील व्यापारी लहान-लहान सातबारा गोळा करून 5 ते 6 हेक्टरच्या तुकड्यांमध्ये बोगस माल नाफेड केंद्रावर घुसवण्याचा मोठा कट रचत आहेत. शासनाने ज्वारीचा हमीभाव वाढवून 4 हजार 23 ते 4 हजार 73 रुपये प्रति क्विंटल केल्याने व खरेदीला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने बोगस व्यापारी सक्रिय झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
 
 
किसान संघाने दाखवलेल्या व ‘फुगवलेल्या’ आकडेवारीमुळे, वरिष्ठ पातळीवर व मंत्रालयात घाटंजी तालुक्यात ज्वारीचे विक्रमी उत्पन्न झाले आहे अशी खोट्या स्वरूपाची आकडेवारी गेली. निसर्गाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे खèया गरीब शेतकèयाच्या हाती काहीच उत्पन्न आलेले नसताना, कागदावर मात्र हे बोगस उत्पन्न वाढवून दाखवले गेले. याच खोट्या आकडेवारीमुळे संपूर्ण घाटंजी तालुका यंदा पीक विम्यापासून वंचित राहिला आहे.
भारतीय किसान संघाचा जिल्हाव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा
 
 
कृउबासचे व्यवस्थापक शुक्रवारपर्यंत जी यादी सादर करणार आहेत, त्यातील बोगस व्यापाèयांचे नाफेड खरेदी आयडी तत्काळ ब्लॉक करावेत. परंतु खèया स्थानिक शेतकèयांची खरेदी नियमित सुरू राहिली पाहिजे. जर शुक्रवारनंतर दोषी महसूल कर्मचारी व बोगस व्यापाèयांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत तर भारतीय किसान संघ जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय धानोरकर व राम जिल्लडवार यांनी दिला आहे.