खामगावमध्ये भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली...

डीजेच्या व भारत माता की जय च्या निनादात शहर दुमदुमले

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
खामगाव,
motorcycle rally in khamgaon स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात कामगार मंत्री ॲडवोकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण शहरातून डीजेच्या निनादात निघालेल्या या रॅलीने खामगाव शहर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेले. ही मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या युवकांनी आणि नागरिकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीतांवर युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
 
motorcycle rally in khamgaon
 
कामगार मंत्री ॲडवोकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते. रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला. तिरंग्याचा सन्मान आणि देशभक्तीची भावना जपण्यासाठी काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीमुळे खामगाव शहरात सर्वत्र देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.