कर्मण्ये स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Karmanye School of Excellence कर्मण्ये स्कूल ऑफ एक्सलन्स, बुटीबोरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे निवृत्त लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, चिकाटी आणि मानवी मूल्यांचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.

data 
 
यावेळी छवी बिसेन हिने हेड गर्ल, तर तनिष्क सहारे याने हेड बॉय म्हणून पदभार स्वीकारला. प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सेवाभावी नेतृत्वाचे आवाहन केले. देशभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
. सौजन्य:. उन्नती दातार,संपर्क मित्र