मिचेल स्टार्कने प्रस्थापित केला विश्वविक्रम!

आंतरराष्ट्रीय डावखुरे खेळाडू दिनानिमित्त घडला इतिहास

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
mitchell-starc : मिचेल स्टार्कने एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १९८ धावांवर सर्वबाद झाला. जेव्हा बांगलादेशने फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा मिचेल स्टार्कने पहिली विकेट घेतली. या विकेटमुळे मिचेल स्टार्क कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, त्याने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या फलंदाजांच्या दिवशी केली.
 
 
starc
 
 
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी, पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, चहापानाच्या विश्रांतीनंतर लगेचच संपूर्ण संघ अवघ्या १९८ धावांवर सर्वबाद झाला. स्टीव्ह स्मिथने अर्धशतक झळकावले, पण त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदाच २०० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला.
त्यानंतर बांगलादेश फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांचे सलामीवीर सादमन इस्लाम आणि तन्झिद हसन तमीम यांनी संघाला स्थिर सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, पण डावाच्या नवव्या षटकात मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर सादमन इस्लामला बाद केले. नॅथन लायनने झेल घेतला. त्याने दोन चौकारांसह ३० चेंडूंमध्ये २० धावा केल्या होत्या. या विकेटसह मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ४३४ विकेट्स पूर्ण केल्या.
मिचेल स्टार्क आता कसोटी क्रिकेटमध्ये डावखुरा गोलंदाज म्हणून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने रंगना हेरथचा विक्रम मोडला होता आणि आता मिचेल स्टार्कने त्याला मागे टाकले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून वसीम अक्रमने ४१४ विकेट्स घेतल्या होत्या. आज, १३ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस साजरा केला जातो आणि याच दिवशी मिचेल स्टार्कने हा विक्रम साधला. एवढेच नाही तर, स्टार्कने आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारताच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आणखी फक्त एक बळी घेऊन तो त्यांना मागे टाकेल.