नागपूर,
National Librarian's Day यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (वायसीसीई) केंद्रीय ग्रंथालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य डॉ. यू. पी. वाघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रंथालय हे ज्ञानाचे उत्कृष्ट केंद्र असून, विद्यार्थ्यांना योग्य माहिती, संसाधने व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात ग्रंथालय व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘पुस्तक देणगी अभियान’ राबविण्यात आले. ग्रंथालयातील संसाधनांचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल मोहित तिरपुडे व रिद्धी शेदामे यांना ‘बेस्ट लायब्ररी यूजर पुरस्कार २०२५-२६’ देऊन गौरविण्यात आले. तसेच ग्रंथालयास पुस्तके देणाऱ्या शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. ग्रंथपाल डॉ. राजेंद्र पाहाडे, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध संसाधनांचा सक्रिय वापर करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
सौजन्य:राजेश पहाडे,संपर्क मित्र