कुख्यात ‘आरडीएक्स’ची येरवडा कारागृहात रवानगी

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
वर्धा,
notorious rdx sent to yerwada jail विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि परिसरात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार अक्षय उर्फ आर. डी. एक्स. पटेल (३०) याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व व्हिडिओ पायरसी करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित झाल्यावर त्याची १२ रोजी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
 
 
notorious rdx sent to yerwada jail
 
सन २०२५ मध्ये १८ अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. तर सन २०२६ मधील ही सहावी एमपीडीए कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बोरगाव मेघे येथील सातपुते लेआउट परिसरातील रहिवासी अक्षय उर्फ आर.डी.एक्स. याच्याविरुद्ध सन २०२२ पासून आतापर्यंत सुमारे १६ गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर अनेकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. खुनाचा प्रयत्न, दरोडा, जीवघेणा हल्ला, आर्म्स अॅक्ट तसेच दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व बाबींचा विचार करून शहर पोलिसांनी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. त्यावर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी शिक्कामोर्तब केला आहे.