नेटफ्लिक्सवर ‘ऑपरेशन सफेद सागर’ची जोरदार चर्चा

कारगिल युद्धातील भारतीय हवाई दलाची अनकही कहाणी

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
मुंबई
operation safed sagar सध्या ओटीटी आणि सोशल मीडियावर एका वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू असून, केवळ सहा भागांची ही सीरिज नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. कथा, कलाकारांचा प्रभावी अभिनय आणि दमदार दृश्यांमुळे ही सीरिज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, तिचे सहाही एपिसोड्स एकाच वेळी ‘बिंच वॉच’ करून पूर्ण करण्याचा मोह प्रेक्षकांना आवरत नाही.
 

operation safed sagar 
ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या वेब सीरिजचे नाव ‘ऑपरेशन सफेद सागर’ आहे. ओनी सेन दिग्दर्शित या सीरिजमधून कारगिल युद्धाचा दुर्लक्षित पैलू उलगडण्यात आला आहे. १९९९ च्या कारगिल संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सफेद सागर’ या मोहिमेची कहाणी यात मांडण्यात आली आहे. सीरिज केवळ रोमांचक नाही, तर भावनिकदृष्ट्याही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरते.
कथा देशभक्तीपर असली, तरी तिच्यात कोणताही दिखावा किंवा अतिशयोक्ती करण्यात आलेली नाही. ‘ऑपरेशन सफेद सागर’ पाहताना अभिमानाची भावना निर्माण होते, तसेच अनेक प्रसंग डोळ्यांत अश्रू आणतात. युद्धाची पार्श्वभूमी असतानाही सीरिजमध्ये केवळ रणभूमीवरील लढाईवर भर देण्यात आलेला नाही.
यातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य operation safed sagar  म्हणजे वैमानिकांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या कुटुंबीयांची चिंता, तसेच प्रशिक्षणादरम्यानचे गमतीदार आणि गंभीर क्षण यांचे केलेले प्रभावी मिश्रण. त्यामुळे युद्धकथेच्या पलीकडे जाऊन सैनिकांच्या भावविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न या सीरिजमधून करण्यात आला आहे.अभिनेता सिद्धार्थने यात स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासह नेतृत्वगुण सिद्धार्थने भूमिकेत प्रभावीपणे उभे केले आहेत. जिमी शेरगिलने विंग कमांडर टोनी धनोआ यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय अभय वर्मा, मिहिर अहुजा, तारुक रैना आणि अर्णब भासिन यांनीही दमदार अभिनय केला आहे. त्यामुळे कथा, अभिनय आणि भावनिक मांडणीच्या जोरावर ‘ऑपरेशन सफेद सागर’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.