‘सखी रंग’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नागपूर,
sakhi rang exhibition हनुमान नगर गृहिणी समाज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सखी रंग – गृहिणींचे प्रदर्शन व विक्री’ या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगला म्हस्के आणि अनघा आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. गृहिणींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
 
sakhi rang exhibition
 
प्रदर्शनात गृहिणींनी स्वतः तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तू, आकर्षक राख्या, गौरी-गणपती सजावटीच्या वस्तू, विविध खाद्यपदार्थ तसेच कलात्मक आणि उपयोगी वस्तूंचे स्टॉल्स मांडले होते. या वस्तूंना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली. स्टॉलधारकांच्या कलाकृती आणि त्यांच्या उपक्रमशीलतेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. गृहिणींमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक शक्ती पुसदकर आणि वर्षा कुळकर्णी यांनी सहभागी स्टॉलधारक, उपस्थित नागरिक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
सौजन्य: अमोल पुसदकर, संपर्क मित्र