पोरवाल महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅली

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
कामठी,
Porwal College स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली उत्साहात काढण्यात आली. प्राचार्य डॉ. स्वप्नील दहाट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
 
por
 
 
यावेळी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही. बी. वंजारी व पर्यवेक्षक एन. डी. मेंढे उपस्थित होते. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅली काढण्यात आली. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याबद्दल आदराचा संदेश देत राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.
सौजन्य : प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल,संपर्क मित्र