नागपूर,
Public Welfare Committee राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीच्या अजनी भाग सेवा विभागातर्फे रामटेकेनगर, वैशालीनगर व कैकाडीनगर येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. डॉ. सुधीर गुप्ता यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविला.
कैकाडीनगर सेवा वस्तीत विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे महत्त्व समजावे या उद्देशाने ‘आई-वडिलांचे पूजन’ करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या आईंच्या हस्ते त्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांसाठी शिलाई केंद्र आणि मुलांसाठी संस्कार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उपक्रमासाठी विविध पदाधिकारी व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.
सौजन्य:रितिका काशिमकर,संपर्क मित्र