योगासन वर्गात गुरुपौर्णिमे निमित्त सत्कार

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Shri Ganesha-Shiva Temple जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या श्री गणेश-शिवमंदिर योगासन वर्गात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजन व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. जयताळा रोडवरील शासकीय प्रेस सोसायटी येथील श्री गणेश-शिव मंदिर सभागृहात कार्यक्रम झाला.कार्यक्रमाची सुरुवात माधुरी पाकमोडे यांच्या गणेशवंदनेने झाली. योगाभ्यासी मंडळातर्फे घेण्यात आलेल्या योग परिचय परीक्षेत केंद्रातील सात विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यांना प्रमुख अतिथी व परीक्षा प्रमुख वसंत नानेकर, मंडळाचे कार्यवाह मिलिंद वझलवार आणि धनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
 
 
अन
 
 
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परीक्षेची तयारी करून घेतल्याबद्दल योगप्रवीण वामनराव बावनकर व जान्हवी कोंढेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेणुका योग वर्गाचे श्री व सौ. सावदेकर तसेच मंदिराचे अध्यक्ष सुबोध चिंचमलातपूरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोयर, जोशी, बावनकर, अपर्णा धोटे, अपर्णा कामडी, सीमा तिजारे, आशा मोटघरे तसेच योगवर्गातील साधकांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:अर्चना सोनकुसरे,संपर्क मित्र