माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला

गुरुद्वारा परिसरात घडली घटना, खासगी रुग्णालयात उपचार

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नांदेड
sukhbir singh bada शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडमध्ये हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड शहराजवळील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या बादल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
 

sukhbir singh badal attacked in nanded: former punjab deputy cm injured, rushed to hospital 
सुखबीरसिंग बादल हे गुरुवारी सकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर गुरुद्वारा परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात बादल जखमी झाले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक पोलीस अधिकारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.घटना घडल्यानंतर बादल यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला आणि हल्लेखोर कोण होता, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.नांदेडमधील या घटनेमुळे राजकीय आणि सुरक्षा वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुखबीरसिंग बादल यांच्यावरील हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे. दरम्यान, बादल यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.