नागपूर,
Tricolor Yatra भाजपा दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता रामेश्वरी येथील शताब्दी चौकातून या यात्रेला सुरुवात होणार आहे.
राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आयोजित या तिरंगा यात्रेत नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य:महादेव तायवाडे,संपर्क मित्र