उमरखेड वन विभागाला संजीवनी मिळणार..!

-अद्ययावत वन संकुल व निवासस्थाने बांधकामास गती -आ. वानखेडेंच्या मागणीवरून मंत्रालयातील बैठकीत निर्णय

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
kisan-wankhede : शहरातील जवळपास सर्वच कार्यालये येणाèया काळात सुटसुटीत होणार असून अडगळीत पडलेल्या वन विभागाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले होते. आमदार किसन वानखेडे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे येथील वन विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार बुधवार, 12 ऑगस्ट रोजी मंत्रालयात उच्चस्तर बैठकीत उमरखेड येथील जीर्ण इमारतींच्या जागी नवीन व अद्ययावत प्रशासकीय वन संकुल व कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामास गती देण्याचे निर्देश दिल्याने वनविभागाला नवसंजीवनी मिळणार आहे.
 
 

y13Aug-Van 
 
 
 
या बैठकीस आ. किसन वानखेडे, अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा), मुख्य वनसंरक्षक (यवतमाळ), उपवनसंरक्षक (पुसद) व नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी व भाजपा जिल्हा समन्वय नितीन भुतडा उपस्थित होते.
 
 
बैठकीदरम्यान आ. वानखेडे यांनी उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या उपविभागीय वनअधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल व वन्यजीव अधिकारी कार्यालये, तसेच कर्मचारी निवासांच्या अत्यंत जीर्ण स्थितीकडे लक्ष वेधले. पावसाळ्यात पाणी साचून निर्माण होणारी धोकादायक परिस्थिती व नगर विकास विभागाच्या विकास आराखड्यातील व्यापारी संकुलाच्या आरक्षणाचा अडसर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
 
वनमंत्र्यांच्या निर्देशानुसार उमरखेड येथील जीर्ण इमारतींच्या जागी नवीन व अद्ययावत प्रशासकीय वन संकुल व कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामास गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने जागेचा मालकी हक्क शासनाच्या बाजूने दिल्याने, नगर विकास विभागाशी समन्वय साधून विकास आराखड्यातील आरक्षणाचा अडसर तत्काळ दूर करण्याचे आदेश अपर मुख्य सचिव यांना दिले आहेत.
 
 
तर मरसूल येथे प्रस्तावित इको टुरिझम प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल त्वरित तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक व संबंधित अधिकाèयांना दिले आहे.
इको टुरिझम प्रकल्प : सकारात्मक प्रतिसाद
 
 
उमरखेड-महागाव मतदारसंघातील वन विभागाच्या इमारतींचा प्रश्न आणि पर्यटन विकासाला चालना देणारा मरसूळ इको टुरिझम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे मतदारसंघातील प्रशासकीय सोयीसुविधा अद्ययावत होऊन निसर्ग पर्यटनाला मोठा वाव मिळेल.
किसन वानखेडे
आमदार, उमरखेड-महागाव