शहरात भारतीय स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
15 August 2026 निसर्गराजा फाउंडेशन, नागपूर तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नाईक टी प्रतिष्ठान, मनीष नगर नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फाउंडेशनचे अध्यक्ष मा. आयु. वामनराव नंदागवळी साहेब भूषविणार आहेत. निसर्गराजा फाउंडेशनच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी राष्ट्रीय पोशाख अर्थात शुभ्र वस्त्र परिधान करून वेळेवर उपस्थित राहावे

२ ० २ ६
 
 
दरवर्षी प्रमाणे राणाप्रताप नगर नागरिक समिती - नागपुर तर्फे राणा प्रताप नगर चौकात झेंडावंदन कार्यक्रम सकाळी ठिक ८.०० ते ८.४५ या वेळेत संपन्न होणार आहे. प्रताप नगर परिसरातील सर्व नागरिक व समितीचे सदस्य यांनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन नागरिक समितीच्या वतीने डॉ. संदीप पथे यांनी केले आहे.
पश्चिम नागपूर नागरिक संघ
श्रीराम मंदिर रामनगर येथे ध्वजारोहण सकाळी ठीक ९.३० वा.
 सौजन्य :डॉ. सोहन चवरे, संदीप देव, संपर्क मित्र