भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा बाईक रॅली

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
बुलढाणा, 
tricolor-bike-rally : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन दि. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. मोटरसायकलवर तिरंगा ध्वज घेऊन, लाऊडस्पीकरवर राष्ट्रभक्तीपर गीते व देशभक्तीचा जयघोष करत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहराचे वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले.
 
 
 
kl
 
 
 
भारत माता की जय, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा, वंदे मातरम् अशा जोशपूर्ण घोषणांनी बुलढाणा शहराचा परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणार्‍या वीर जवानांच्या त्यागाची आठवण करून देत, त्यांच्या शौर्याला मानवंदना देण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. रॅलीची सुरुवात शिवालय जनसंपर्क कार्यालय विश्राम भवन जवळ येथून झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक, जनता चौक, चिंचोले चौक, धाड नाका मार्गे रॅली तानाजी नगर येथील शहीद स्मारकावर पोहोचली. रॅलीचा समारोप करण्यात आला. शहीद स्मारकावर भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व प्रमुख भाजपा पदाधिकार्‍यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान देणार्‍या शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभेदार अभिमन्यू करपे माजी सैनिक उपस्थित होते.
 
 
या तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्डे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, मुन्ना बेडवाल, डॉ मधुसूदन सावळे, अ‍ॅड. सुनील देशमुख, सिंधु खेडेकर, नारायण हेलगे, अ‍ॅड. मोहन पवार, डॉ राजेश्वर उबरहंडे, सतीश पाटील, उमेश पाटील, प्रा विष्णुपंत पाटील,प्रा भगवान गरुडे, उषा पवार, वर्षा पाथरकर, शोभा ढवळे, जोशी, दलाल,अंबादास घेवंदे, सुभेदार अशोक किलबिले, सखाराम नरोटे, मुकुंद देशपांडे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.