पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या ध्वजारोहण

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |


तभा वृत्तसेवा

नवी दिल्ली

Flag Hoisting Prime Minister Modi देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला परिसर आणि राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

 
flag
 
 
यावेळी लालकिल्ल्यावरील कार्यक्रमाची संकल्पना ‘युवा शक्ती आणि विकसित भारत-२०४७’ ही आहे. यावेळी प्रथमच लाल किल्यावरून ‘वंदेमातरम्’ गायले जाणार आहे. ‘वंदेमातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता मोदी तिरंगा फडकवील. राष्ट्रगीत झाल्यानंतर मोदी देशवासीयांना संबोधित करतील. पाच हजार विशेष निमंत्रितांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेच्या लाभार्थी तसेच स्वयंसेवकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
 

पंतप्रधान मोदी लालकिल्ल्यावर पोहोचताच संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ त्यांचे स्वागत करतील. लष्कर, नौदल, वायुदल आणि दिल्ली पोलिसांची विशेष तुकडी मोदी यांना मानवंदना देईल.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून शहराला पोलिस छावणीचे रूप आले आहे.