अन्यथा, मतं मागायला येणार नाही: आ. कुणावार

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
सिंदीरेल्वे,
mla kunawar सिंदीकरांना अपेक्षित ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. मुख्यमंत्र्यांंची स्वाक्षरी झाली की काम फत्ते! जोपर्यंत रुग्णालयाचा तिढा सुटणार नाही, तोपर्यंत आपण जनतेला मतं मागणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा आ. समीर कुणावार यांनी येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर केली.
 
mla kunawar
 
येथील जगप्रसिद्ध तान्हा पोळ्याच्या आयोजनासाठी आयोजित बैठकीत त्यांनी ही प्रतिज्ञा घेतली. बैठकीला येताना ग्रामीण रुग्णालय संघर्ष समितीच्या कार्यकत्र्यांनी व सामान्य नागरिकांनी आ. समीर कुणावार यांना शिवाजी चौकात भेटून हा ज्वलंत प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पोळ्याच्या आयोजनाचा आढावा घेतला आणि स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेला अत्यावशक सूचना केल्या. जनतेच्या सहकार्यानेच हा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचला. आपल्या १५ वर्षांच्या काळात त्याला सुवर्णक्षण लाभले हे आपले अहोभाग्य असे आपण समजतो हे त्यांनी विनम्रपणे सांंगितले. बैठकीला शहरातील शेतकरी, नंदी व देखावे सादर करणार्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होती.