प्रदीप चौगावकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
वर्धा,
pradeep chougavkar मूळचे वर्धा येथील रहिवासी असलेले आणि सध्या नागपूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे पोलिस निरीक्षक असलेले प्रदीप वसंत चौगावकर यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण पोलिस सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाले आहे. चौगावकर यांनी नोकरीची सुरुवात वर्धा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेपासुन सुरू केली. त्यानंतर सीताबर्डी नागपूर शहर, डिसीपी नागपूर झोन १ यांचे विशेष पथक, नागपूर ग्रामीण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा, कामठी, बुटीबोरी, कोंढाळी पोलिस स्टेशन, गडचिरोली येथे नक्षल विरोधी कारवाई, नक्षल गुन्हे तपास, अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास, अमरावती ग्रामीण येथे परतवाडा, वरुड या ठिकाणी सेवा दिली असुन त्यानंतर बॉम्ब शोधक पथक अमरावती आणि सध्या पोलिस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे नेमणूक आहे.
 
 
pradeep chougavkar
 
पोलिस दलात महासंचालकांचे सन्मानचिन्ह, विशेष सेवा पदक आणि अनेक बक्षिसं पटकावले असुन अनेक क्लिष्ट गुन्हे त्यांनी उघड केले असल्याने त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. पुढील महिन्यात आपण निवृत्त होत आहोत. पोलिस प्रशासनात प्रामाणिकपणे नोकरी केली. नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात हा सन्मान मिळतो आहे, ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी असल्याची प्रतिक्रिया चौगावकर यांनी दिली. तर आपल्या पतीला हा पुरस्कार मिळतो आहे यावर आपला विश्वासच बसत नाही. गडचिरोली येथे कामावर असताना एका फायरिंगमध्ये ते थोडक्यात बचावले होते. त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती पोलिस प्रशासनाने आतापर्यंत दिली आहे आणि आज निवृत्तीच्या वळणावर पदक जाहीर होणे हीच त्यांच्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध कवयित्री मंजूषा चौगावकर यांनी दिली.