नागपूर,
Tidke Vidyalaya कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृतिनिमित्त ग्रामगीता प्रबोधन दिंडीअंतर्गत ‘विद्यार्थ्यांच्या दारी विद्यार्थी प्रबोधन जागर’ हा कार्यक्रम तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, काटोल रोड येथे झाला. राष्ट्रीय प्रबोधनकार मोहन चोरे यांनी सादर केलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रबोधन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
तंत्रज्ञानाच्या युगात बुद्धीचा विकास आणि विज्ञानाची प्रगती झपाट्याने होत असली, तरी माणूस स्वावलंबी जीवनापासून दूर जात आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेत पदवी आणि नोकरीला अधिक महत्त्व दिले जात असल्याने स्वयंरोजगार, स्वाभिमानी जीवन आणि श्रमप्रतिष्ठेचे संस्कार युवापिढीवर कमी होत आहेत. विद्यार्थ्यांना वाचनासोबतच स्वावलंबनाचे धडे मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.प्राचार्य विलास रामटेके अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे देवीदास लाखे, मुकेश कोल्हे, सुनीतारक्षक, पुष्पा रक्षक यांची उपस्थिती होती. विलास बोरगमवार यांनी स्वागत केले. वृषाली कोल्हे यांनी संचालन केले.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक ,संपर्क मित्र