बुलढाणा,
uncle-murdered : शेतीच्या वाद असल्याने पूतण्याने सख्या काकाचा खून करणार्या आरोपी समाधान पंडीत जाधव यांना बुलढाणा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी जन्मठेपाची शिक्षा व दहा हजार रूपयांचा दंड दि. १४ ऑगस्ट रोजी सुनावला.

प्रकरणाची हकीकत अशी की दि. २९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान फिर्यादी विलास शेषराव जाधव, वय वर्ष ३५ रा. कुंबेफळ व त्यांचे वडील मयत शेषराव रामा जाधव यांचे मौजे कुंबेफळ गट नं. २६ मधील शेतामध्ये काम करीत असताना अचानक शेषराव रामा जाधव, वय वर्ष ६० यांना ओरडण्याचा आवाज फिर्यादी विलास यास आल्यामुळे विलास जाधव वडिलांच्या आवाजाच्या दिशेने धावत गेला. शेषराव रामा जाधव यांना पकडून ठेवल्यानं मुख्य आरोपी समाधान पंडीत जाधव हा त्याचे हातातील धारदार चाकूने शेषराव जाधव यांना भोकसून वार करीत असल्याचे पाहिले त्यामुळे आरडाओरड केली असता सर्व आरोपी त्याला पाहून पळून गेले. परंतु फिर्यादीचे वडील शेषराव जाधव हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते व त्यांच्या छातीवर व दोन्ही पायावर चाकूने वाराच्या जखमा होवून पोटातील आतडे बाहेर आले होते.
अशाप्रकारे आरोपी समाधान पंडीत जाधव याने फिर्यादीचे वडील शेषराव रामा जाधव यांचा धारदार चाकूने वार करुन त्यांचा खून केला व स्वत पो.स्टे घाड येथे जावून गुन्हयाची कबुली दिली होती. फिर्यादी विलास जाधव यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन पो.स्टे चाड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासअधिकारी यांनी आरोपी क्र. १ समाधान व दादाराव यास दिनांक ३०/१०/२०२२ रोजी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले होते, त्यानंतर पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी समाधान याने गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलीसांना काडून दिला होता तर त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा आरोपीच्या कपड्याचे वर सपा नमुन्यांचे वेगवेगळे पाणी पंचनामे तयार केले होते व महत्तवाच्या साथीदारांचे जबाब नोंदविण्यात आले होते. तपास पूर्ण करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावा मिळून आल्यामुळे समाधान जाधव, दादाराव जाधव, आशाबाई बडगुजर व आनंदीबाई जाधव यांचे विरुध्द विद्यमान न्यायालयामध्य दोषारोपपत्र आले होते दोषारोपपत्र दाखल आरोपी समाधान जाधव व दादाराव जाधव बुलढाणा येथील कारागृहामध्ये बंदी होते.
आरोपीविरुध्द दोष ठेवल्यानंतर गुन्हा सिध्द होण्याच्या दृष्टीकोनातून सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. त्यामध्य फिर्यादी विलास जाधव, घटनास्थळ व जप्त पंच, डॉ. निवृत्ती देवकर, तपासअधिकारी पो नि अनिल पाटील व इतर साक्षीदारांची साथ नोंदविण्यात आली तर घडलेल्या घटनेने गार्भीय लक्षात घेता सरकार पक्षाच्या वतीने आरोपीस जास्तीतजास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातुन प्र. जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यानी प्रभावी युक्तीवाद केला त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी आरोपीला दोषी ठरवून त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रूपये दंड फिर्यादीस देण्याचा आदेश दिला. तर विद्यमान न्यायालयाने आरोगी कमांक २ ते ४ यांना संशयाचा फायदा देवून र्निदोष सोडण्यात आले. कोर्ट पैरवी म्हणून पि.एस आय रमेश चव्हाण यानी सरकार पक्षास मदत केली.