वर्धा,
10 shops broken चोरट्यांच्या टोळीने वर्धा शहरात अक्षरक्ष: धुमाकूळ घालत चक्क १० दुकानांना लक्ष केले. रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्या.रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धुनीवाले मठ ते प्रियदर्शिनी महाविद्यालयाकडे जाणार्या मार्गावरील ५ दुकानांचे शटर चोरट्यांनी फोडली. प्रकाश माखिजानी यांच्या दुकानातून ४० हजारांची रोख, राजेश माखिजानी तसेच महेश माखिजानी यांच्या दुकानाचे शटर तोडून तेथेही चोरी केली. त्याच परिसरातील वसीम अक्रम पठाण यांच्या डेली निड्समधून रोख चोरून नेले. उमेश भोयर यांच्या किराणा दुकान, न्यू आर्ट कॉलेजजवळ पंकज मुरारका यांच्या दुकानातून चोरटे खाली हात परतले. नागपूर मार्गावरील गिरिराज ऑटो, नालवाडी येथील जिजाऊ मेडिकल आणि एका मोबाइल या तिन्ही दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न केला. बॅचलर मार्गावरील मगन संग्रहालयाजवळील दिनेश बोधनकर यांच्या सराफा दुकानातून सर्वाधिक माल चोरून नेल्याची माहिती आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या दुकानातून चोरट्यांनी जवळपास १० किलो चांदी चोरून नेल्याचे सांगण्यात आले. सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कान्हापूर येथे मोबाइलच्या दुकानातून १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.