शहरात स्वातंत्र्यदिन साजरा

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
नागपूर,
मूकबधिर विद्यालय
15 August 2026 शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. १९४६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत बालवर्ग ते बारावीपर्यंत कर्णबधिर विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमातून शिक्षण दिले जाते.वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन जी. पवनकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत नीलदावार, सचिव मुकुंद पैठणकर, कोषाध्यक्ष मीनाक्षी सरवटे, मुख्याध्यापिका द्रौपदी चव्हाण आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कवायत, डंबेल्स, मास ड्रिल, मनोरा तसेच साने गुरुजींचे ‘बलसागर भारत होवो’ हे देशभक्तीपर गीत सांकेतिक भाषेत सादर केले.विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामागे शिक्षक व मार्गदर्शकांचे परिश्रम दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल वासे यांनी केले. अश्विनी जिभकाटे यांनी दुभाषकाची भूमिका बजावत मान्यवरांचे संवाद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
 

mhesh  
 
 
 
सौजन्य:महेश मोळकर,संपर्क मित्र
प्रतापनगर
15 August 2026 राणा प्रताप नगर नागरिक समितीतर्फे महाराणा प्रताप नगर चौकात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. समितीतर्फे गेल्या ३४ वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.प्रा. दिलीप दिवे आणि अॅड. निधी तेलगोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रसेविका समितीच्या वैदेही व वेदुला समितीच्या सेविकांनी वंदे मातरम् सादर केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत गात ध्वजाला मानवंदना दिली.
सौजन्य:संदीप देव ,संपर्क मित्र
 
sandip
 
 
 
नवी शुक्रवारी
नवी शुक्रवारी परिसरातील मारोती देवस्थान येथे मारोती देवस्थान पंचकमेटीतर्फे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्य उत्सव समितीचे संयोजक अतुल नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत व झेंडा गीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.“युवा पिढी हा देशाचा खरा कणा असून युवकांनी राष्ट्रहिताच्या चळवळीत पुढे यावे,” असे आवाहन अतुल नाईक यांनी केले.
 
 

nresh  
 
 
 
सौजन्य:नरेश सावरकर,संपर्क मित्र