नागपूर
Ajni-Chunabhatti Route अजनी-चुनाभट्टी मार्गावर पोलिस क्वार्टरसमोर मोठे झाड अचानक कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. झाडाच्या फांद्या व खोड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
झाडाखाली काही वाहने दबली असून, सुदैवाने मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून झाड हटविण्याचे तसेच मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सौजन्य: राहुल जोशी , संपर्क मित्र