अंकुर प्री स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Ankur Pre School महिला कला निकेतनतर्फे संचालित अंकुर प्री स्कूल आणि माँटेसरी प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. संस्थेच्या अध्यक्षा प्रेरणा जामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षिका, कर्मचारी व पालकांनी भारतमाता पूजन केले.
 
 
pre
 
अंकुरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. माँटेसरी विद्यार्थिनींनी भाषणे व गीतांचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुण्या सीए रश्मी अडबे यांनी देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने संकल्प करण्याचे आवाहन केले.सामूहिक वंदे मातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली.
सचिव ॲड. सुफला ताटके, संपर्क मित्र