पोलिस आयुक्त, सहआयुक्तांसह 21 पोलिस अधिकाऱ्यांना पदके

- पोलिस भवनात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात -पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व पदकांचे वितरण

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
medals awarded नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील पोलिस भवन येथे ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या वेळी पोलिस आयुक्तांनी उपस्थित सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 

medals awarded 

ध्वजारोहणानंतर नागपूर शहर व नागपूर ग्रामीण पोलिस दलातील राष्ट्रपती पदक, गृह मंत्रालयाचे अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवापदक तसेच पोलिस महासंचालक विशेष सेवापदक प्राप्त अधिका-यांचा आणि कर्मचा-यांचा पुष्पगुच्छ व मेडल देऊन विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती पदकासाठी निवड झालेले सहायक पोलिस आयुक्त वैभवकुमार जाधव आणि पोलिस हवालदार राजकुमार जनबंधू यांचा गौरव करण्यात आला. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे अतिउत्कृष्ट सेवापदक प्राप्त सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, सहायक पोलिस आयुक्त, वैभव जाधव, नरेंद्र हिवरे, पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्यासह १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला.medals awarded तसेच गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक प्राप्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे, ज्ञानेश्वर भेदोडकर, रितेश आहेर, प्रमोद घोंगे, चंद्रकांत काळे यांच्यासह २१ पोलिसांचा गौरव करण्यात आला. पोलिस महासंचालकांचे विशेष सेवापदक मिळालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर, सहायक पोलिस निरीक्षक निलेश उरकुडे आणि खडतर सेवापदक प्राप्त पोलिस उपनिरीक्षक सुनील जाधव, नितीन अवधूत, अनिल तुमसरे यांचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, विनिता शाहू, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस अंमलदार, नागरिक, विद्यार्थी आणि उपस्थित होते.