अनिल कांबळे
नागपूर,
presidents medal स्वातंत्र्यदिनाच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलिस पदकांच्या यादीत नागपुरात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकांनी गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक मिळविणाऱ्यांमध्ये गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव, डॉ. दिगंबर प्रधान, प्रशांत कुलकर्णी, अरुण आत्राम, प्रदीप चौगावकर यांचा समावेश आहे. पोलिस दलात दीर्घकाळ गुणवत्तापूर्ण सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर केली जातात. यंदाच्या महाराष्ट्राच्या यादीत विविध पदांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि हवालदारांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
डॉ. दिगंबर प्रधान हे एसीबीचे पोलिस अधीक्षक आहेत, तर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. तसेच अतिउत्कृष्ट सेवेसाठीसुद्धा त्यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस उपअधीक्षक प्रशांत कुलकर्णी आणि गडचिरोलीत कार्यरत अरुण आत्राम यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप वसंतराव चौगावकर यांचाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या राष्ट्रपती पोलिस पदकाच्या यादीत समावेश आहे. यासोबतच एसीपी नरेंद्र हिवरे, अनिता मोरे, पोलिस निरीक्षक रितेश अहेर, मुकुंद कवाडे, ज्ञानेश्वर भेदोडकर यांचीही नावे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी असलेल्या पदकांच्या यादीत आहे.presidents medal कारागृहाचे संजय तलवारे यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.नागपूर पोलिसांची कामगिरी उत्तमशहर पोलिस दलातील उपनिरीक्षक सुनील जाधव यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलिस महासंचालकांचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यांच्यासोबत एएसआय अनिल तुमसरे, किशोर मालोकार यांचाही समावेश आहे. तसेच ग्रामीणचे पीआय प्रमोद घोंगे, नरेंद्र गौरखेडे, बटू पांडे, अजय तिवारी, रत्नाकर ठाकरे आणि चंद्रकांत काळे यांचाही अतिउत्कृष्ट सेवा पदके मिळविणाऱ्यांमध्ये समावेश आहे. एसीबीचे पोलिस अधिकारी विजय माहुलकर, ज्ञानेश्वर नारखेडे, मनोहर जंगवाड, भरत ठाकूर, संजय नवदेती यांच्यासह नागपुरातील २६ पोलिसांचा पदकप्राप्त करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.