नागपूर,
Senior Citizens Corporation “भारतीय दर्शन स्वपासून सुरू होते आणि परमेष्ठीची सीमाही ओलांडते,” असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र डोळके यांनी केले. ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भच्या आध्यात्मिक व ज्ञानवर्धक उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
वेद, उपनिषदे आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान आजच्या वैज्ञानिक कसोटीवरही सिद्ध होत असल्याचे सांगत त्यांनी जीवन कसे व का जगावे, याचे विवेचन केले. विशेष अतिथी सुनीलजी कीटकरू यांनी उपक्रमात सातत्य ठेवून तो सर्वांसाठी खुला करण्याची अपेक्षा व्यक्त केली.ॲड. अविनाश तेलंग यांनी तारतम्याने जीवन जगण्याचे आवाहन केले. अनिल पात्रिकर यांनी प्रास्ताविक केले. शाम पातूरकर यांनी दर गुरुवारी दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. अरविंद शेंडे यांनी आभार मानले.
सौजन्य : विनोद व्यवहारे ,संपर्क मित्र