नागपूर,
Smt. Dadibai Deshmukh Hindu Girls' School श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महाल येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी . रिया डोमणे हिच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीतानंतर विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, सचिव मीरा चाफेकर, सीमा फडणवीस, मुख्याध्यापिका माया बमनोटे व उपमुख्याध्यापक सुबोध आष्टीकर उपस्थित होते. . नंदिनी डुंगरे हिने सूत्रसंचालन केले. पल्लवी देशमुख यांनी आभार मानले.
सौजन्य:माया बमनोटे ,संपर्क मित्र