पर्यटनासाठी गेलेले दोन युवक बुडाले

-ढासगड पर्यटनस्थळातील घटना एकाचा मृतदेह आढळला, दुसर्‍याचा शोध सुरू

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
मुल्ला, 
Two youths drowned देवरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या ढासगड येथे १५ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी गेलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना घटना दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हेतराम गुलाब सयाम (२५) आणि कृष्णा लखन कापगते (२०) दोघेही राहणार बोपाबोडी ता. सडक अर्जुनी अशी त्या युवकांची नावे असून यापैकी कृष्णा कापगते याचा मृतदेह सापडला असून हेतरामचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेतराम आणि कृष्णा हे दोघे ढासगड येथे पर्यटनासाठी गेले होते. यावेळी दोघेही पाण्यात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाल्याने एकच खळबळ उडाली.
 
 
 
s345
 
 
घटनेची माहिती मिळताच चिचगडचे ठाणेदार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्यात आला. यावेळी कृष्णाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र, हेतरामचा थांगपत्ता लागला नाही. घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कृष्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून हेतरामचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच दोघांच्या कुटूंबीयांनी घटनास्थळी धाव घेत एकच टाहो फोडला. घटनेची नोंद चिचगड पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, ढासगड परिसरात पर्यटनासाठी येणार्‍या नागरिकांनी पाण्याच्या ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ढासगड परिसरावर शोककळा पसरली आहे.