तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
crackdown-in-school-and-college-areas : नशामुक्त व तंबाखूमुक्त अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम राबविली. 1 जुलै ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान राबविलेल्या या अभियानात पोलिसांनी धडक कारवाई करत 380 कायदेशीर कारवाया केल्या आहेत.
पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात व अपर अधीक्षक अशोक थोरात यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय परिसरांची विशेष तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंंघन करणाèया दुकानदारांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
शैक्षणिक परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाèया पानटपèयांवरही कारवाई करण्यात आली असून 257 पानटपèया निष्कासित करण्यात आल्या आहेत. तसेच अभियानाच्या कालावधीत तब्बल 984 महाविद्यालये व शाळा तंबाखूमुक्त व नशामुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसंदर्भात नियमांचे उल्लंघन करणाèया दुकानदारांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर नियमानुसार विल्हेवाटीची प्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ व तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी केवळ कारवाई न करता जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही पोलिस विभागाने भर दिला आहे.
शैक्षणिक परिसरात अंमली पदार्थ अथवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा सेवन करणाèयांविरुद्ध यापुढेही सातत्याने आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
‘नशामुक्त युवासुरक्षित समाज’ या संकल्पनेनुसार पालक, शिक्षक, विद्यार्थी, दुकानदार आणि नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या अभियानास सहकार्य करून शैक्षणिक परिसर नशामुक्त व तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे.