यवतमाळला आदर्श जिल्हा बनविण्याचा संकल्प : संजय राठोड

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sanjay-rathod : शासन, प्रशासनासह सर्वांच्या सहभागातूनच विकसित यवतमाळ घडविता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रांत राज्यातला एक आदर्श जिल्हा बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
 
 
y16Aug-Dhwajarohan
 
 
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवार, 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, आजचा दिवस हा देशासाठी बलिदान देणाèया स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आणि विकसित भारत घडविण्यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य लाभले. आता आपल्यासमोर स्वतंत्र भारताला विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत बनविण्याचे आव्हान आहे.
 
 
यवतमाळ जिल्हा हा कष्टकरी शेतकरी, मेहनती कामगार, उद्योजक, युवक आणि सामाजिक बांधिलकी जपणाèया नागरिकांचा जिल्हा आहे. या जिल्हा विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 64 टक्के पाऊस झाला आहे. यंदाच्या खरीपात 8.65 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीच्या सुरुवातीच्या काळात बोगस सोयाबीन बियाणे, खते आणि कीटकनाशकाच्या बाबतीत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
 
 
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकèयांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्ती घोषित केली आहे. यात पहिल्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यातीत 43,647 शेतकèयांच्या खात्यात 374 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘मिशन उभारी’ या उपक्रमातून संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला आहे. तसेच प्रेरणा प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये शेतकरी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शेतकèयांना थेट आर्थिक आधार देणाèया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2.89 लाख शेतकèयांना 57.94 कोटी रुपयांचा 23 वा हप्ता देण्यात आला आहे. तसेच पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान अधिनियम मंजूर केला आहे. यासह शेत पांदण रस्ते योजनेंतर्गत सातही विधानसभा क्षेत्रांमध्ये 14 हजारपेक्षा जास्त किमी लांबीचे एकूण 8,767 पांदण रस्ते होणार आहेत.
 
 
जिल्हा प्रशासनामार्फत 110 मंडळांत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात लाभार्थ्यांना 3 लाखांपेक्षा जास्त दाखले आणि 66 हजार डिजिटल 7-12 वितरित करण्यात आले. ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत 50 विद्यार्थ्यांना ‘सुपर 50’ अंतर्गत जेईई आणि नीट परीक्षांसाठी दोन वर्षांचे संपूर्ण मोफत निवासी प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहोत.
सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसह वसतिगृह प्रवेश, स्वाधार योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जात आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत मृत व्यक्तींच्या 24 वारसांना कायमस्वरूपी शासकीय नोकरीत सामावून घेतले आहे.
विशेष सत्कार
 
 
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, महाराजस्व अभियानात उत्कृष्ट कार्य करणाèया अधिकाèयांचा सत्कार करण्यात आला. विविध विभागांतील उल्लेखनीय कामगिरी करणाèया पुरस्कारार्थी अधिकारी कर्मचाèयांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा शोध व बचाव पथकासाठी आपत्कालीन सेवा वाहनाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.