शिवनगरात स्वातंत्र्यदिन साजरा

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Yogasangini Yoga Group शिवनगर येथे योगसंगिनी योग ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगप्रमुख सौ. कल्पनाताई गुरमुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
 

mdura 
 
 
यावेळी विश्व मांगल्य सभेच्या अंजनी जिल्हा संयोजिका सौ. राधिका जोशी आणि नंदनवन जिल्हा अध्यक्ष अॅड. मधुरा सेनाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. गेल्या आठ वर्षांपासून सौ. कल्पनाताई गुरमुळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगसंगिनी योग ग्रुपचा निःशुल्क उपक्रम सुरू आहे. परिसरातील योगसंगिनी मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाल्या.
सौजन्य:मधुरा सेनाड, संपर्क मित्र