नवचैतन्याचा ८०वा स्वातंत्र्यदिन

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
सरस्वती विद्यालय
15-8-2026 शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर वंदे मातरम्, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व तमिळ ध्वजगीत सादर करण्यात आले. एनसीसी कॅडेट्स तसेच स्काऊट्स अँड गाईड्सच्या शिस्तबद्ध संचलनाने कार्यक्रमाची शोभा वाढली.यावेळी दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष टी. के. व्यंकटेश, सचिव व्ही. मीनाक्षी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रेशमी उमेश, उपमुख्याध्यापिका शैली स्वामिनाथन अय्यर आदी उपस्थित होते.कार्यक्रमात ‘वाणी’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन तसेच शाळेच्या ‘कॅलिडोस्कोप’ या वृत्तपत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. १९७२च्या माजी विद्यार्थ्यांनी ‘संजीवनी’साठी योगदान दिले.
 
saras
 
 
 
सौजन्य : अनघा पेंडके,संपर्क मित्र
टिळक पत्रकार भवन 
टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित पत्रकार व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.कार्यक्रमाला टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे सचिव शिरीष बोरकर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव अनुपम सोनी, ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रभाकर दुपारे, संचालक विनोद देशमुख, विवेक पुराडभट, महेश उपदेव तसेच संघाचे सदस्य परितोष प्रामाणिक, आनंद मोहरील, आजीवन सदस्य श्यामकांत पात्रीकर, सुरेश कनोजिया, चंद्रकांत अणेकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
 
 
pra
 
 
 
 सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र
नवयुग प्राथमिक शाळा
राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिरीष तारे, प्रवीण ठेंगणे, विष्णू हिवरकर, स्वाती कुलकर्णी व मुख्याध्यापक अजय काळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीते व नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अध्यक्ष शिरीष तारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जयश्री देऊळकर यांनी, तर आभार प्रियंका बोबडे यांनी मानले.
 
 
naras
 
 
 
सौजन्य:वर्षा नरसापूरकर,संपर्क मित्र