बेलेव्ह्यु येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
80th Independence Day, Bellevue बेलेव्ह्यु (अमेरिका) वाशिंग्टन राज्यातील बेलेव्ह्यु येथे ‘इंडियन फ्रेण्डस इन बेलेव्ह्यु’च्या वतीने भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रा. युसुफभाई कपाडिया यांच्या हस्ते भारतीय तिरंगा फडकविण्यात आला.
 
 
nana6
 
 
 
कार्यक्रमात सुमारे ६५ भारतीयांनी सहभाग घेतला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व वंदे मातरम्‌चे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करण्यात आली. स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षात पदार्पणानिमित्त देशभक्तीपर विचार व्यक्त करण्यात आले.
सौजन्य : नागेश दंडे,संपर्क मित्र