नागपूर,
Ashram School Safety धानोरा तालुक्यातील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेची चौकशी करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती विकास परिषदेतर्फे १४ ऑगस्ट रोजी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांना निवेदन देण्यात आले.
घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घटनेची पूर्ण चौकशी करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अपर आयुक्तांनी दिले.यावेळी परिषदेच्या अध्यक्ष संघमित्रा ढोके, उपाध्यक्ष पूर्णिमा मेश्राम, नागपूर शहर अध्यक्ष सुलोचना घोटेकर व ॲड. पल्लवी मुलमुले उपस्थित होत्या.
सौजन्य:धनंजय मुलमुले,संपर्क मित्र