नागपूर
Avabodh Foundation, Addiction Recovery युवा पिढीला सकारात्मक दिशा देत व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने अवबोध फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. फाउंडेशनने नुकतीच ‘ड्रग्ज फ्री अवेअरनेस कॅम्पेन’ या व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमेचे आयोजन केले.
फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासोबतच विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्याची इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येत असून, आतापर्यंत ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या माध्यमातून इंटर्नशिप पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार १५ हून अधिक क्षेत्रांमध्ये विविध सामाजिक संस्थांशी त्यांना जोडले जाते.शालेय वयातील मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याने पालकांनी मुलांच्या सवयी, मित्रपरिवार व दिनक्रमाकडे लक्ष द्यावे. मूल चुकीच्या मार्गावर जात असल्याचे आढळल्यास त्याच्याशी संवाद साधून प्रेमाने व योग्य समुपदेशनाने त्याला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
सौजन्य:प्रवीण कुथे,संपर्क मित्र