पाळीव गुरे रस्त्यावर बांधली जात असल्याने उपकेंद्रात जाणे-येणे झाले अवघड

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
मानोरा,
Ayushman Health Centre तालुयातील गिरोली गावातील शासनाच्या आरोग्य उपकेंद्रासमोरचा परिसर गुरांनी व्यापल्याने हा उपकेंद्र नेमका मानवासाठी आहे की गुरासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.
 

Ayushman Health Centre  
गिरोलीच्या आयुष्मान आरोग्य उपकेंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच्या रस्त्यावर गायी, म्हशी आणि वासरे बांधलेली आहेत. परिसरात चिखल, सांडपाणी आणि कचरा साचला आहे. त्यामुळे रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी यांना उपकेंद्रात ये-जा करणे अत्यंत अवघड झाले आहे. शासनाने माणसांच्या उपचारासाठी बांधले हे आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या अतिक्रमण मानसिकतेमुळे दररोज पाळीव गुरे उपकेंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच बांधली जात आहेत. यामुळे परिसर अस्वच्छ झाला असून संसर्गाचा धोका वाढला आहे. उपकेंद्र प्रशासनाने याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई केली गेली नाही. ग्रापंच्या निष्क्रियतेमुळे अतिक्रमणकर्त्यांना बळ मिळत असल्याची चर्चा गावात आहे. गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध रुग्णांना अशा घाणेरड्या आणि गुरांनी भरलेल्या रस्त्यावरून उपकेंद्रात जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
तातडीने गुरांचा बंदोबस्त करून आरोग्य उपकेंद्राचा परिसर अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी गिरोली येथील नागरिकांनी केली आहे. अन्यथा उपकेंद्राचे आरोग्यविषयक उद्दिष्टच धोयात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी लक्ष घालून त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे