देवळीतील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमाकुल करा

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
देवळी,
Deoli Encroachment Regularisation Demand देवळी नगर परिषद अंतर्गत प्रभाग ६ व ७ तसेच शहरातील विविध भागांत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे शासनाच्या प्रचलित नियमानुसार नियमाकुल करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे सभापती व नगरसेवकांनी केली आहे.
नगर परिषद देवळीमार्फत सादर करण्यात आलेल्या अहवालावर तातडीने कारवाई करावी तसेच शासनाच्या प्रचलित नियमांनुसार पात्र अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे लवकरात लवकर नियमाकुल करण्याबाबत संबंधित अधिकारर्यांना आवश्यक निर्देश द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
 

महसूलमंत्री बावनकुळे यांना सभापती व नगसेवकांचे निवेदन 
नगर परिषदमार्फत अतिक्रमणधारकांच्या जागा नियमाकुल करण्यासंदर्भात आवश्यक कारवाई करून संबंधित विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही अद्याप या प्रकरणावर अंतिम कारवाई झालेली नसल्याने अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अतिक्रमणे नियमाकुल न झाल्यामुळे संबंधित नागरिकांना मालमत्तेचा हक्क, बांधकामासंदर्भातील परवानग्या तसेच विविध शासकीय सुविधा व योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वर्षांपासून सदर जागांवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा प्रश्न मानवीय दृष्टिकोनातून सोडविणे आवश्यक असल्याचे नगसेवकांनी म्हटले आहे.
यावर ना. बावनकुळे म्हणाले की,Deoli Encroachment Regularisation Demand  महाराष्ट्र सरकारने १ जानेवारी २०११ पूर्वीची आणि निवासी वापरात असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, त्यानुसार कारवाई लवकर करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
 
 
निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष शोभा तडस, न.प. सभापती शुंभागी कुर्जेकर, गटनेता तथा नगरसेवक उमेश कामडी, सभापती विजय गोमासे, सभापती मनिषा लांखडे, उपसभापती ज्योती खाडे, स्विकृत सदस्य रवी कारोटकर, नगरसेवक विभावरी बजाईत, सुरेखा कारोटकर, विश्वजिता पोटदुखे, ललीता धुर्वे, भाजपा महिला शहर अध्यक्ष विद्या झिलपे यांची उपस्थिती होती.