नागपूर
Dinanath Vidyalaya दीनानाथ विद्यालयाच्या १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे ‘भव्य म्युझिकल धमाका’ या आठव्या संगीत सोहळ्याचे आयोजन रविवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे.राज्यसभा खासदार माया इवनाते प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून दीनानाथ विद्यालयातील तत्कालीन शिक्षकवृंद व माजी प्राचार्या इला बॅनर्जी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात अनंत कपाले, सुमित्रा ठाकरे, सचिन पतरंगे, संजय बिड्यांता, अरिजित मुखर्जी, अमलेंदू दत्ता, सुरेखा चाहंदे, अनिल गाडेकर, देबाशिष बॅनर्जी, अखिलेश हळवे व चंद्रवर्धन परुळकर हे माजी विद्यार्थी गायन सादर करणार आहेत. विविध शहरांसह परदेशात स्थायिक झालेले माजी विद्यार्थीही या कार्यक्रमासाठी नागपुरात येणार आहेत. त्यामुळे संगीत मैफलीसोबतच जुन्या आठवणींना उजाळा देणारा स्नेहमेळावा रंगणार आहे.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र