दुधाळ्यात महिले सोबत मारहाणीसह अश्लील टिप्पणीचा आरोप

चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |

मालेगाव,

Dudhala Assault Case तालुयातील दुधाळा येथे २८ वर्षीय महिले सोबत कथितरीत्या मारहाण करून शिवीगाळ, अश्लील टिप्पणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून चौघाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 

Dudhala Assault Case Woman Allegedly Beaten, Abused and Threatened; Four Booked
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरुळनाथ तालुयातील वनोजा येथील २८ वर्षीय महिला १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुधाळा येथे गेल्या होत्या. त्यावेळी केशव गायकवाड व त्यांची पत्नी कावेरी गायकवाड यांनी महिलेला घरासमोरून निघून जाण्यास सांगत कथितरीत्या अश्लील शिवीगाळ केली. याला विरोध केल्यावर दोघानीही थापड व बुयानी मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, विशाल केशव गायकवाड हा हातात लाकडी दांडा घेऊन बाहेर आला. त्याने महिलेच्या उजव्या हातावर, पाठीवर तसेच डाव्या खांद्यावर दांड्याने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच विशालने महिलेविषयी आक्षेपार्ह व अश्लील टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर विशालची पत्नी दिपाली गायकवाड हिनेही कथितरीत्या शिवीगाळ केली.तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, चौघांनी पुन्हा घरासमोर आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
 
या प्रकरणी केशव गायकवाड, कावेरी गायकवाड,Dudhala Assault Case  विशाल गायकवाड व दिपाली गायकवाड सर्व राहणार दुधाळा यांच्याविरुद्ध शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण करीत आहेत.