नागपूर :
Empress Tara Rani Bhosale Sadan रेड स्वस्तिक सोसायटीच्या प्रकल्पांतर्गत हिरवा बाजार, ता. रामटेक येथील नाशिकराव तिरपुडे प्रिपरेटरी स्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन, शाळेचा ७वा स्थापना दिवस तसेच सम्राज्ञी ताराराणी भोसले सदनाच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात पार पडला.स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्योगपती कोठारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. स्वर्गीय डॉ. प्रफुल्ल सी. कोठारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व डॉ. रंजन कोठारी व परिवाराच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या सम्राज्ञी ताराराणी भोसले सदनाचे उद्घाटन डॉ. शरदचंद्र निंबालकर व समाजसेवक डॉ. प्रवीण डबली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एनटीपीएसचे संस्थापक व सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल, रेड स्वस्तिक सोसायटीचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर अशोक शिंदे, केंद्र संचालक अर्जुन घुगल, केंद्र सहसंचालक जगन्नाथ गराट तसेच माजी सभापती महेश बामनोटे उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या केंद्रात पोलीस व सैनिक भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपाचे इनडोअर व आऊटडोअर प्रशिक्षण दिले जाते. डॉ. प्रवीण डबली यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचा सल्ला देत मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साधनांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन केले. तसेच जलसंवर्धन व विहिरींच्या संवर्धनाबाबत युवकांनी जागरूक राहावे, असे सांगितले.
डॉ. शरदचंद्र निंबालकर यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी चांगली मूल्ये आत्मसात करावीत, अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करावेत, असा संदेश दिला. ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ गराट यांनी केले, तर आभार अर्जुन घुगल यांनी मानले.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र