शेतीच्या वादातून शेतकर्‍यास मारहाण

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
Turns Violent हिसई शिवारातील शेतीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादातून एका शेतकर्‍यास चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच शेतात पुन्हा येऊ नकोस, अशी धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मंगरूळनाथ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 Turns Violent
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज सहदेव जाधव (वय ४९) रा. हिसई, मंगरूळनाथ ह.मु. पुणे यांची हिसई शिवारात गट क्रमांक १६७, २३ व १३२ मध्ये एकूण ८ हेटर ७० आर शेती आहे. सदर शेतीवर आरोपींनी बेकायदेशीर कब्जा केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. १४ ऑगस्ट रोजी फिर्यादी आपल्या शेतात काम करणार्‍या मजुरासह शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी संदीप दामोदर जाधव, रामभाऊ परसराम भारती, गणपत सखाराम जाधव व दीपक मुरलीधर जाधव यांनी फिर्यादीला शेतात येऊ नका, असे म्हणत शिवीगाळ केली.त्यानंतर मारहाण व लोटालोट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(१), २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एएसआय चरण चव्हाण करीत आहे.