नागपंचमीच्या पुजेसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

नरसिंगपूर शिवारातील घटना

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
आष्टी (श.), 
farmer-attacked-by-a-tiger : आष्टी परिसरातील नरसिंगपूर शिवारात नागपंचमीच्या पूजेसाठी शेतात गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामभाऊ उदेभान भोयर (७०) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
 
 
 
JK
 
 
 
नागपंचमी असल्याने शहरातील कवठीपुरा येथील शेतकरी रामभाऊ भोयर हे शेतात पूजा करण्यासाठी गेले होते. पूजा सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे अध्र्या पुजेवरच शेतकर्यावर काळाने घाला घातला. या हल्ल्यात शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांनी वनविभागाला देताच वनविभागाच्या तळेगाव वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्रधिकारी गजानन लांबाडे, वनपाल रोहिनी पडोळे, वनरक्षक इंद्रपाल भगत, ठाणेदार राजेश जोशी, पोलिस उपनिरीक्षक हर्षल नगराळे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
 
या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.