सुवर्णकार महिला मंडळातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Goldsmiths' Women's Association स्नेहनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात सर्व सुवर्णकार महिला मंडळांच्या वतीने ‘स्वराज्य स्वातंत्र्याचा महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.
 
 

maya  
 
 
सुवर्णकार समाजाच्या नगरसेविका माया हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण व ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर महिलांनी देशभक्तीपर ध्वजगीत व भजन सादर केले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षा वैशाली दांडेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘स्वदेश’ विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या भगिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील महिलांनी सहकार्य केले. चहा-नाश्त्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.
सौजन्य : भारती रोटे,संपर्क मित्र