नागपूर,
Nagpur Garden Club सिव्हिल लाईन्स येथील नागपूर गार्डन क्लबतर्फे १९ ते २२ ऑगस्टदरम्यान ‘मूलभूत बागकाम’ विषयावर चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा दररोज सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत होणार आहे.
समीत अदमाने मार्गदर्शन करणार असून, रोपांची निगा, मातीची तयारी, मूलभूत बागकाम कौशल्ये तसेच घरच्या घरी बाग फुलविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. नवशिक्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर गार्डन क्लबने केले आहे.
सौजन्य:नितीन दाते,संपर्क मित्र